Friday, December 4, 2009

दिवेलागणी....

दिवेलागणी....

दूर क्षितीजावर जेव्हा, सूर्य मावळत असतो;
तुझ्या आठवणींचा समुद्र, मनात माझ्या उसळत असतो.

डोळ्यांत अश्रु साचतात, मन माझं भरून येतं;
ह्रदयाची स्पंदनं वाढतात, माझं भावनाविश्व दाटून जातं.

अश्रुच्या प्रत्येक थेंबात, माझं प्रेम साचलेलं असतं;
त्या हळव्या क्षणी, मन माझं थिजलेलं असतं.

काळजाचा ठोका चुकतो, त्या कातरवेळी;
भावनांच्या मर्यादा तुटतात, त्या संध्याकाळी.

तुझ्या आठवणींचे समुद्रपक्षी, घरट्याकडे परतू लागतात;
काळोख्या त्या रात्री, तुझी स्वप्नं मात्र जागतात.

देऊन जातेस मला, तू तेच जुनं आभाळ पुन्हा;
अन मी पण वेड्यासारखं, तुझंच चित्र काढत बसतो पुन्हा पुन्हा....
----------------------------------------------------------------------------------------------

कविता मी लिहीलेली नाहि पण माझ्या "मना"ला भाउन गेली.

No comments: