Sunday, December 6, 2009

डोळे उघडे असून दिसेनासे झाले

1.
सन २००६, जून महिन्यातील ८ तारीख, मुंबईतील के. इ. एम्. हॉस्पिटल मधून माझी सुटका झाली. माझा डॉ. आप्टेंवर विश्वास बसत नव्हता आणि मला सद्धा आजची तारीख खोटी वाटत होती. मला calendar  मधे अजुनही १९९६ साल दिसत होते. चक्क दहा वर्षे मागे. मला काही समजत नव्हते मी इथे कसा आणि future मधे कसा आलोय... डॉ. आपटे मला वारंवार सांगायचा प्रयत्न करत होते की हे future नाहिये आणि मी १० वर्षे झालीये इथे गवर्नमेंट हॉस्पिटल मधे उपचार घेत आहे.

अचानक माझ्या डोळ्यासमोर पांढरा प्रकाश पडला. काही कलायाच्या आत मला डोळे उघडे असून दिसेनासे झाले. माझे डोक्याला काहीतरी लागल्याचा भास् झाला. उघडे डोळे कधी मिटले ते कळले नाहि. भास् आणि आभास यांचा खेळ माझ्या मनात सुरु झाला. खरे खोटे काही समजत नव्हते. मी माझेच शरीर काही अंतरावरून बघू लागलो. मला काही भावना, वेदना, दुःख, सुख, चिंता काहीही जाणवत नव्हते. ते पूर्णपणे रक्ताने माखलेले शरीर, त्याच्या आजुबाजुला ३/४ डॉकटर बरयाच  पारिचारिका आणि त्यांची धावपळ बघून आश्च्यर्य मात्र वाटत होते. त्यांचे त्या शरिरावरती चाललेले अथक प्रयत्न बघून माणसाच्या चिकाटीचा अंदाज आला. इलेक्ट्रिक शोकच्या झटकयानी हलानारे शरीर इतर डॉ. नी पकडून ठेवले होते. कितीतरी वेळ हे असेच चालले  होते. 

त्या शरिरावर डोक्टर शस्रक्रिया करत होते आबी माझे मन मात्र भटकत होते. हॉस्पिटलच्या रूममधून मन बाहेर गेले तेंव्हा असंख्य लोकांची गर्दी दिसली, वाहनानी भरलेले रस्ते दिसले. ह्या गर्दीतील लोक, इथे हॉस्पिटल मधे पडलेले, रक्ताने लाल झालेले हे शरीर, त्याच्या भोवतालचे त्या शरीराला वाचावन्याचा प्रयत्न करणारे डोक्टर, हे सर्व बघून मी कोण हे काही कळत नव्हते. कितीतरी तासांच्या प्रयत्ना नंतर डॉकटर आशेचा निश्वास सोडला आणि तेथून गेले. त्याना काहीसे यश मिळाले होते पण ते शरीर कायमचे झोपले होते.... मी हे सर्व दुरून बघतच होतो. बर्याचदा तर मी भटकंती करून पुन्हा आपल्या शरिराजवळ येत असे.

आज माझा बिट्स पिलानी मधील शेवटचा दिवस होता. माझे एम् टेक करून झाले होते. सुट्टीत इथे न थांबता प्रोफेसर शर्मा याना भेटून मी सरल मुंबईची ट्रेन गाठणार होतो.  मानसीला तसा मी आधीच फोन केलेला होता. मी २ वर्षे माझे M. Tech. होई पर्यंत मुंबईला गेलो नव्हतो. त्यामुले तिला भेटण्याची तीव्र ओढ़ झालेली होती. तिच्याशी खुप खुप बोलायचे होते, पुन्हा मरीन ड्राइववर हातात हात घेउन फिरायचे होते. जुहू चौपाटीवर तिच्यासोबत भेळ खायची होती. तासन तास तिला बघायचे होते. हाजी अलीला जायचे होते, आम्ही हे सर्व फोनवरुनच नक्की करून ठेवले होते. ठरल्याप्रमाने सकाळी ९ लाच physics डिपार्टमेंट ला गेलो. प्रोफेसर डॉ. शर्मा नेहमी प्रमाने ८ लाच आलेले होते. त्याना भेटलो आणि सुट्टीत एक्स्ट्रा प्रोजेक्ट वर्क करण्यासाठी परत येइल या बोलीवर तिथून पळ काढला. डॉ. शर्मा ओप्टिकल फिजिक्स मधे megabit communication with fibre optics यावर रिसर्च करत होते आणि मी यावर M. Tech. नंतरही  काम करावे असी त्यांची इच्छा होती. असो.

दुपारी ४ वाजता दादर स्टेशनला ट्रेन आली. आई बाबा दोघेही कामानिमित्त स्टेशनवर येऊ शकले नव्हते. निलिमा माझी स्वीट सिस्टर स्टेशन वर आली होती. तिला मानसी बद्दल सर्व काही माहित होते, तिची ती वर्ग मैत्रिण, त्यामुळ तिने स्टेशनवरच मला मानसी बद्दल सांगायला सुरवात केली. taxi मधे सामान टाकले आणि आम्ही वरलीला निघालो. निलिमाला घरी पाठवून मी मधेच राकेश च्या घरी उतरलो. राकेशकडे यामाहा २४० CC इम्पोर्टेड बाइक होती, ती घेतली आणि जुहुला निघालो. स्वत:शीच बोलत मी मानसीच्या विचारांत पूरा बुडालो होतो. माझे कुठेही ध्यान नव्हते, फक्त मानसीला भेटन्याच्या ओढीने बाइक भन्नाट चालली होती.

2.
<< to be added >>

 3.
टी. म. क. रोड ला  मंडलीक चौकाजवल  अचानक एका कारच्या होर्न आणि  ब्रेक्स्चा आवाज आला. आणि काही क्षणात काही समजायच्या आधी मी रक्ताच्या थारोल्यात पडलेलो होतो. अचानक माझ्या डोळ्यासमोर पांढरा प्रकाश पडला. काही कलायाच्या आत मला डोळे उघडे असून दिसेनासे झाले. माझे डोक्याला काहीतरी लागल्याचा भास् झाला. उघडे डोळे कधी मिटले ते कळले नाहि.

... continued...

<< वरील घटना, त्यातील पात्र, घटना क्रम आणि स्थळ हे पूर्णपणे काल्पनिक आहे. या घटनेचा कुणाही व्यक्तिशी प्रत्यक्ष्य किंवा अप्रत्यक्ष सम्बन्ध नाहि. तसे असल्यास तो योगायोग समजावा. - संजय जाधव >>

Friday, December 4, 2009

दिवेलागणी....

दिवेलागणी....

दूर क्षितीजावर जेव्हा, सूर्य मावळत असतो;
तुझ्या आठवणींचा समुद्र, मनात माझ्या उसळत असतो.

डोळ्यांत अश्रु साचतात, मन माझं भरून येतं;
ह्रदयाची स्पंदनं वाढतात, माझं भावनाविश्व दाटून जातं.

अश्रुच्या प्रत्येक थेंबात, माझं प्रेम साचलेलं असतं;
त्या हळव्या क्षणी, मन माझं थिजलेलं असतं.

काळजाचा ठोका चुकतो, त्या कातरवेळी;
भावनांच्या मर्यादा तुटतात, त्या संध्याकाळी.

तुझ्या आठवणींचे समुद्रपक्षी, घरट्याकडे परतू लागतात;
काळोख्या त्या रात्री, तुझी स्वप्नं मात्र जागतात.

देऊन जातेस मला, तू तेच जुनं आभाळ पुन्हा;
अन मी पण वेड्यासारखं, तुझंच चित्र काढत बसतो पुन्हा पुन्हा....
----------------------------------------------------------------------------------------------

कविता मी लिहीलेली नाहि पण माझ्या "मना"ला भाउन गेली.

Sunday, October 25, 2009

Drawings...

sometimes drawing pictures is not an bad idea. It gives us relief and relaxation!
आमचा  आर्य आता बऱ्यापैकी चित्र काढायला लागलाय. आणि आजकाल मला motivate करतोय पण कन्टाळा नेहमीच आडवा येतो. जरा न पटन्यासारखेच कारण ना ;-) उगाच "मना"ची समजूत.




Oil on canvas.

Thursday, October 15, 2009

ध्रुव तारा कुणाला दिसलाच नाहि सर्वाना दिसला तो पांढरा शुभ्र शुक्रतारा ...

दिवा जळत राहतो, त्याला असते का कसली चिंता?
कुणासाठी प्रकाश पसरवतो, तो प्रकाश कुणाला मिळतो तरी का?
त्या प्रकाश्याची तीव्रता सुद्धा दिव्यास ठाउक असते की नाहि कुणाला माहित.
तेल जळत असते की वात जळत असते?
सर्व असेच का  म्हणतात की दिवा जळतो, कुणाला वात जळताना का नाहि दिसत? तेल जळताना का नाहि दिसत? वातेच्या वेदना का नाहि समजत? त्यासाठी वातच व्हावे लागते. तेलही संपले तर वात तरी काय करणार म्हणा...
जाउद्याना का विचार करावा एवढा? 
जसे पांढरया शुभ्र पोशाखातील एक सज्जन स्वत:ला फाशी घेतो असला हा प्रकार झाला. सर्वाना त्याचा जीवनरूपी दिवा सतत जळ ताना दिसला, त्याचे जीवनातील तेल कधी संपले आणि नुसतीच अर्धवट जळलेली वात कशी राहिली हे त्याला स्वत:ला कधी जाणवले नाहि. ध्रुव तारा कुणाला दिसलाच  नाहि सर्वाना दिसला तो पांढरा शुभ्र शुक्रतारा ...

Thursday, January 11, 2007

माझ्या मना

जरा थांब ना जवळ माझ्या...
कसा अन कुठे रे शोधू तुला?
मग जरा थांब ना जवळ माझ्या.

क्षणात इथे तर क्षणात तीथे
तू आहेस तरी कुठे?
भटकुन अजुन थकत कसा नाही?
नयन माझे बेचेन केलेस
का अस्वस्थ केले मला?
मग जरा थांब ना जवळ माझ्या...

जगने आणि मरने...ठाऊक आहे मला
मग तरीही का ही थट्टा आता?
आटले डोळे आता नाही होत ओले
व्रुतूही बदलला, काळही बदलला
आता नाही सहन होत हा दुरावा
मग जरा थांब ना जवळ माझ्या...

माझ्या मना,
मग जरा थांब ना जवळ माझ्या...
जरा थांब ना जवळ माझ्या...