Sunday, October 25, 2009

Drawings...

sometimes drawing pictures is not an bad idea. It gives us relief and relaxation!
आमचा  आर्य आता बऱ्यापैकी चित्र काढायला लागलाय. आणि आजकाल मला motivate करतोय पण कन्टाळा नेहमीच आडवा येतो. जरा न पटन्यासारखेच कारण ना ;-) उगाच "मना"ची समजूत.




Oil on canvas.

Thursday, October 15, 2009

ध्रुव तारा कुणाला दिसलाच नाहि सर्वाना दिसला तो पांढरा शुभ्र शुक्रतारा ...

दिवा जळत राहतो, त्याला असते का कसली चिंता?
कुणासाठी प्रकाश पसरवतो, तो प्रकाश कुणाला मिळतो तरी का?
त्या प्रकाश्याची तीव्रता सुद्धा दिव्यास ठाउक असते की नाहि कुणाला माहित.
तेल जळत असते की वात जळत असते?
सर्व असेच का  म्हणतात की दिवा जळतो, कुणाला वात जळताना का नाहि दिसत? तेल जळताना का नाहि दिसत? वातेच्या वेदना का नाहि समजत? त्यासाठी वातच व्हावे लागते. तेलही संपले तर वात तरी काय करणार म्हणा...
जाउद्याना का विचार करावा एवढा? 
जसे पांढरया शुभ्र पोशाखातील एक सज्जन स्वत:ला फाशी घेतो असला हा प्रकार झाला. सर्वाना त्याचा जीवनरूपी दिवा सतत जळ ताना दिसला, त्याचे जीवनातील तेल कधी संपले आणि नुसतीच अर्धवट जळलेली वात कशी राहिली हे त्याला स्वत:ला कधी जाणवले नाहि. ध्रुव तारा कुणाला दिसलाच  नाहि सर्वाना दिसला तो पांढरा शुभ्र शुक्रतारा ...