Thursday, January 11, 2007

माझ्या मना

जरा थांब ना जवळ माझ्या...
कसा अन कुठे रे शोधू तुला?
मग जरा थांब ना जवळ माझ्या.

क्षणात इथे तर क्षणात तीथे
तू आहेस तरी कुठे?
भटकुन अजुन थकत कसा नाही?
नयन माझे बेचेन केलेस
का अस्वस्थ केले मला?
मग जरा थांब ना जवळ माझ्या...

जगने आणि मरने...ठाऊक आहे मला
मग तरीही का ही थट्टा आता?
आटले डोळे आता नाही होत ओले
व्रुतूही बदलला, काळही बदलला
आता नाही सहन होत हा दुरावा
मग जरा थांब ना जवळ माझ्या...

माझ्या मना,
मग जरा थांब ना जवळ माझ्या...
जरा थांब ना जवळ माझ्या...